अनुसूचीत जाती व नवबौध्द विकास

ग्रामीण भागाचा सुयोग्य विकास करणेचे दृष्टीने उपलब्ध मानवी संपत्तीद्वारे ग्रामीण भागात टिकाऊ सामुहिक मालमत्ता निर्माण करीत असतानाच ग्रामीण भागात रहाण्या-या व अंग मेहनतीची अकुशल कामे करण्या-या, मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम २००५ पारीत केला असुन सदर कायदयान्वये ग्रामीण भागातील कुटुंबाला १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करुन देण्याची हमी देण्यात आलेली आहे.महाराष्ट्र शासनाने राज्याची रोजगार हमी योजना,व केंद्राची राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांची सांगड घालुन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आमलात आणलेली आहे.जिला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र असे संबोधले जाते.

योजनेची वैशिष्ठे –
  • ग्रामपंचायत स्तरावर कामाची निवड ग्राम सभा करणार
  • तालुका पातळीवर नियोजन आराखडयास मंजुरी पंचायत समिती देणार
  • जिल्हा पातळीवर नियोजन आराखडयास मंजुरी जिल्हा परिषद देणार
  • मंजुर कामांच्या ७५ टक्के खर्चाची कामे ग्राम पंचायत मार्फत राबविणार
  • १०० दिवसांपेक्षा जास्त दिवस रोजगार देण्याची जबाबदारी राज्य शासनाची राहिल.
  • शासन निकषा प्रमाणे किमान मजुरीची हमी.
  • अर्ज केल्यापासुन १५ दिवसांत रोजगार पुरविणार.
  • कुटुंबातील प्रौढ व्यक्ती अर्जाद्वारे त्याचे सर्व कुटबातील व्यक्तींची नावे नोंदणी करु शकतील
  • एकदा केलेली नोंदणी ५ वर्षे कालावधीकरीता राहिल.
  • रोहयो कायदया अंतर्गत मजुरांना मिळणा-या सर्व सोई सुविधा मिळतील.
  • विविध स्तरावरील कर्तव्य्
१.ग्रामपंचायत स्तरः-
  • कुटुंबांची /मजुरांची नोंदणी करणे/जॉबकार्डवरील नोंदी करणे
  • मजुरांची कामाची मागणी घेणे/कामे पुरविणे
  • कामाचे सर्वेक्षण करणे/अंदाजपत्रक करणे
  • कामाचे नियोजन करणे
  • मजुरांना मजुरी व कामासाठी निधी उपलब्ध करुन देणे
  • वेळेवर मजुरी वाटप करणे
  • सामाजिक अंकेशन
२.तालुका स्तर –
  • ग्रामपंचायतींना कामाच्या नियोजनाबद्दल मार्गदर्शन करणे
  • कामाचे नियोजन करुन घेणे
  • हजेरीपट व निधीचा हिशोब ठेवणे
  • तालुक्याची माहिती संगणक प्रणालीचा वापर करुन संकलित करुन जिल्हा स्तरावर पाठविणे
  • संगणक प्रणालीद्वारे झालेल्या कामांचे हजेरीपट ऑनलाईन करणे
Logo 1
Logo 2
Logo 3
Logo 4
Logo 5
Logo 6
Logo 7
Logo 8
Logo 6
Logo 7
Logo 8